सातत्याने तीन पिढया योगसाधना करणारे दत्तसंप्रदायाशी एकरुप झालेले हे नागेश नरसिंहपूरचे पूजाधिकारी होत. यांचे आजोबा माणंकोपंतास श्री विठल साक्षात प्रसन्न झालेले होते. पिता गोपाळ योगी पुरुष होते. त्यांनी योगसाधनेव्दाराच प्राणत्याग केला होता.यांची माता तेर येथे संतचरणी वास्तुव्यह करुन होत. नागेशांना बालपणीच योगसिध्दी प्राप्तं झाली. त्यांच्या गुरुचे नांव निंबराज, नागेशांचा विवाह झाला पण पुत्रसंतान झाले नाही. सईबाई नावाची कन्या झाली. ती अनगर येथे दिली. नागेशांच्या पत्नीसचे निधन झाले. ते विरक्त होऊन तीर्थाटन करु लागले. गुरुपदेश करु लागले. तो त्यांनी कन्यालाही दिला. सर्वाभूती परमेश्वर पाहणारा नागेश वेडयापिश्या प्रमाणे वागे. म्हाणून लोक त्यांना वेडा नागेश म्हणत. त्यांचे वर्तन कधी कधी ब्राम्हाण्याला बाध येईल असे घडे. म्हणुन क्षेत्रस्थांनी त्यांचेवर बहिष्कार घातला व प्रायश्चित घेण्यास सांगितले. त्यांचे वडील बंधू गोमजींनी ते मान्य केले. देवालयाच्या महाव्दारी सभा होऊन तीन चमचे वितळलेले शिसे प्राशन करण्यास त्यांना सांगितले गेले. नागेशांनी ते मान्य करुन शांतपणे शिशाख रस सेवन करुन उर्वरित रस उपस्थितांच्यां अंगावर फेकुन देऊन ते अरण्यात पळून गेले. ज्यांच्यां अंगावर तप्ता शिसेपडले त्यांचे फोड आले पण दाह मात्र झाला नाही. नंतर त्यांनी अनगर येथेच कन्ये कडे वास्तेव्य‍ केले. यथावकाश समाधी घेण्याची इच्छात कन्येजवळ प्रदर्शित केली. तिने जमिनीत विवर खणून त्यावर वृंदावन बांधले. शांतचित्ता नागेशांनी विवरात प्रवेश केला आणि योगसमाधी घेतली. नागेशबाबाची ही समाधी आजही अनगर येथे आहे. श्रीनृसिंहाच्या शेजारतीचे हे एक रचयिते. त्यांनी रचिलेले मानसपुजा, भावार्थ ग्रंथ व ज्ञानग्रंथबोध हे अन्य ग्रंथ प्रसिध्द असून अभ्यालसकाची वाट पाहत आहेत.